14 वित्त आयोग निधीतून शाळेला संरक्षक भिंत
कुळधरण / प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी नजीकच्या पोटरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच शिवाजी चोरमले, माजी उपसरपंच भागचंद पोटरे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोग निधीतून शाळेभोवती संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने पूर्ण सहकार्य केले जाईल असे सरपंच चोरमले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते दत्तापोटरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पोटरे, लक्ष्मण पोटरे, माणिक पोटरे, रमेश सकट, मनोहर वाघमारे, प्रमोद खेतमाळीस, संतोष जंजीरे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या भोवती कुंपणाचे काम होत असल्याने शाळेत वृक्षलागवड करणे आता शक्य होणार आहे.