Breaking News

‘डॉ. तनपुरे’ शिक्षण संस्थेचा उत्कृष्ट निकाल


राहुरी विशेष प्रतिनिधी 

येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी, वांबोरी, कारवाडी (मालूंजे खु) या तिन्ही शाळांमध्ये १२ वीच्या परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला, अशी माहिती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब गायकवाड़ यांनी दिली. 

येथील भागिरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (शास्त्र शाखेचा) निकाल १०० टक्के निकाल लागला असून शेख अस्मा मरुफ ७२. ३० टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सय्यद मिसबा अश्पाक ६९. टक्के {द्वितीय}, तमनर पूजा संतराम ६८. टक्के {तृतीय} आली. तर वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पाटील प्रियंका आनंदा हिने ७९. ८४ टक्के मार्क्स मिळवित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. चव्हाण गीता सुरेश ७७. ३८ टक्के {द्वितीय}, लांबे अश्विनी राजाराम ७७. २३ टक्के {तृतीय} आली. कला शाखेचा ८८. ४६ टक्के निकाल लागला. यामध्ये मंडलिक मयुरी भाऊसाहेब हिने ८१. टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कोकाटे अश्विनी रमेश ७६. १५ टक्के {द्वितीय}, जाधव सोनाली गहिनीनाथ ७५. ३८ टक्के {तृतीय} आली.

संस्थेचे अध्यक्ष माजी खा. प्रसाद तनपुरे, सचिव अरुण तनपुरे, विश्वस्त डॉ. उषाताई तनपुरे, सुजाता तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थी शिक्षक यांचे अभिनंदन केले.