Breaking News

केंद्रीय मंत्री ना. आठवले 11 एप्रिलला जिल्हा दौर्‍यावर


आर.पी.आयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 11 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर येत असून, त्यांचा नियोजित दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक 1 एप्रिल 2018 रोजी स.11 वा. श्रीरामपूर व्ही.आय.पी गेस्ट हाऊस येथे बैठक बोलविण्यात आली असल्याची माहिती आर.पी.आयचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल यांनी दिली. या बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड, राज्याचे मार्गदर्शन अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, श्रावण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी सकाळी 9 वाजता स्वर्गीय मा. आमदार जयंत ससाणे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना सांत्वन देण्यासाठी निवासस्थानी भेट देणार आहेत. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दत्तनगर या ठिकाणी थांबून संगमनेर येथे पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. ना. आठवले यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी श्रीरामपूर आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र साळवी, कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, राहुरी तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जीतेंद्र रनशूर, आशिष शेडके, रमेश गायकवाड, राजेंद्र साठे, सुशील धाईजी, रितेश एडके, राजन ब्राह्मणे, राजू गायकवाड, बाळासाहेब जाधव, पापाभाई बिवाल, नितीन जाधव, नंदू शेलार, महिला आघाडीच्या मंदा पारखेंसह जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.