Breaking News

कायदा सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी शेजारील 4 जिल्ह्यांतून माजी उपनगराध्यक्ष तडीपारचा प्रस्ताव


तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणार्‍या श्रीगोंदा येथील माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांच्यासह अतिक कुरेशी व 22 कुरेशी बंधूंचा पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी नगर सह शेजारील चार जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला असून संबधीतांना नोटिसा बजावन्यात आल्या आहेत. या प्रस्तावाला पारनेर - श्रीगोंदाचे उपविभागीय अधिकारी गोविंद दानेज यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष अख्तर शेख कुरेशी यांना हादरा बसला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणार्‍या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करते. गेल्या काही वर्षांत शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभल्याने अनेक टोळ्या उदयास आल्या. वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हाणामार्‍या, खून आदी घटना नित्याचा भाग बनू लागल्या. या टोळ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी टोळीचा म्होरक्या, त्यांचे साथीदार आणि त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करून त्यांना तडीपार करण्याची कारवाई सुरु केली आहे. यामध्ये मा. उपनगरध्यक्ष अख्तर सिकंदर शेख यांच्यासह नवनाथ दगडू जाधव, अर्जुन बापू भिसे, सुभाष चौधरी रा. काष्टी, महेश उर्फ पप्पू कोथिम्बीरे रा. श्रीगोंदा, बलभीम पठारे, महेंद्र महारनूर (वांगदरी), अतुल दुतारे श्रीगोंदा, स्वप्नील राजू खेत्रे रा. झेंडा चौक श्रीगोंदा, दीपक रामदास ससाणे, बापू रामदास ससाणे रा. हिरडगाव, अतिक कुरेशी, अन्वर सय्यद, नदीम कुरेशी, फिरोज कुरेशी, तय्यब कुरेशी, काल्या कुरेशी, मुन्ना कुरेशी, मैनुद्दीन कुरेशी, मुस्ताफ कुरेशी, बाबु कुरेशी, अब्दुल कुरेशी, इरफान कुरेशी, मोबीन कुरेशी, मुजमीन कुरेशी, तालीब कुरेशी, राजू कुरेशी, अय्याज कुरेशी, दादीभाई कुरेशी, अरबज कुरेशी यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. कुरेशी बंधूंचा श्रीगोंदा कत्तलखाना आहे, परंतू गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणावरून त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा भंग केला. पुणे येथील गोरक्षक पालन संस्थेच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन परिसरात मारहाण केली. तेंव्हापासून कुरेशी बंधूंच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी कुरेशी बंधूंना तडीपार करण्याचा महाराष्ट्र पोलिस 1951 चे कलम 55 नुसार प्रस्ताव तयार करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील काही वाळू तस्करांवर, काही बड्या व्यक्तींच्या तडीपारीचे अस्त्र चालविण्यात येणार असल्याचे समजते. मात्र यावर कमालीची गुप्तता पाळण्याचा निर्णय घेतला आहे.