Breaking News

पर्यावरण कुठल्याही गोष्टीची शाश्‍वती राहिलेली नाही कृषी व पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू

जगातील लोक हे पर्यावरणामुळे अस्वस्थ आहेत. पर्यावरणाचे शोषण होत आहे. कुठल्याही गोष्टीची शाश्‍वती राहिलेली नाही. शोषणामुळे प्रदुषण वाढले आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेंद्रिय शेती नजरेआड झाली असून, रासायानिक खतांच्या असंतुलित व अतिवापरामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे. त्यामुळे विषमुक्त अन्न मानवाच्या शरीरात स्लो पॉयझनचे काम करीत आहे. कृषी व पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

आत्मा अहमदनगर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मित्रांसाठी रासायनिक खत साक्षरता अभियान जिल्हास्तरीय प्रशिक्षणप्रसंगी श्री. हजारे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. एन. के. भुते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना हजारे म्हणाले की, पर्यावरणाचा भक्कम करायचं असेल, तर कृषी क्षेत्राला बळकट करावं लागणार आहेर. कृषी पर्यावरणाचा भाग आहे. कृषीची शक्ती वाढली पाहिजे.