Breaking News

डॉ.तात्या लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन

जळगाव, दि. 17, डिसेंबर - मुंबई येथील विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन उत्साहात मू.जे.महाविद्यालयात आज पार पडले.यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कला शाखेचे उप प्राचार्य डॉ. सुरेश तायडे, चित्रपटाचे निर्माते विराग वानखेडे उपस्थित होते. यावेळी चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला. चित्रपटात डॉ. लहाने यांचे भूमिकेत मकरंद अनासपुरे असून अलका कुबल, रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


चित्रपटात केतकी माटेगावकर, साधना सरगम यांचे गायन असून सोबत खान्देशातील 25 गायक कलाकरांचा समावेश आहे. यात मू.जे.महाविद्यालयाचा गायक प्रज्ञाचक्षू स्व.तेजस नाईक याचाही आवाज आहे. विराग वानखेडे यांचे नावावर 4 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

 या सिनेमाच्या कमाईतून ते मोफत नेत्रालय औरंगाबाद आणि मुंबई येथे सुरु करणार आहेत. डॉ. लहाने यांच्या गरीब परिस्थिती ते नामवंत नेत्रतज्ञ पर्यंतचा प्रवास सिनेमात आहे. यावेळी विराग वानखेडे म्हणाले की, अंध व्यक्तींना होणारा त्रास मी अनुभवला तसेच पाहिला. डॉ. लहाने यांचे क ार्य समजून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर सिनेमा बनविला आहे. .