महाराणी ताराबाई विद्यालयाचा 12 वीचा निकाल 98.41 टक्के
केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.12वी कॉमर्स फेब्रुवारी/मार्च 2018चा निकाल 98.41% लागला आहे. इयत्ता 12वी परीक्षेत कु. सीमा बन्सी उरमुडे ही 85.08% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे, तसेच कु. आरती काळू माने ही 84.46% गुण मिळवून दुसरी व कु. आयेशा अख्तर तांबोळी ही 80.62% गुण मिळवून विद्यालयात तृतीय आली आहेस तसेच किर्ती रमेश सातपुते हिला 79.69% व मोहिनी दत्तात्रय खेतमाळस हिला 79.54% गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे प्राचार्या पी. आर. कारले, प्रा. डी. बी. हरवणे, प्रा. आर. आर. धायतडक, संस्थेचे सचिव बबनराव कोतकर, खजिनदार डी. बी. साळवे, राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, केडगावचे सर्व संचालक आदींनी अभिनंदन केले आहे. इयत्ता 12 ची परीक्षेमध्ये कु.यीमस बन्सी उरमुडे हीला 85.08 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. तीच्यसह 85 टक्क्याच्या पुढील विद्यार्थ्यांचे केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिनंदन होत आहे.