Breaking News

कर्ज, बहिणीच्या लग्नाच्या चिंतेने तरूण शेतक-याची आत्महत्या

नांदेड, दि. 22 - बँकेचे कर्ज कसे फेडावे, बहीणींचे लग्न कसे होईल या विवंचनेत मौजे मंडाळा येथील एकवीस वर्षाच्या शेतकर्याने विषारी औषध प्रश्‍न करून  आत्महत्या केली. 
ऊमरी तालुक्यातील मौजे मंडाळा पोस्ट बितनाळ येथील लक्ष्मीकांत लक्ष्मणराव पुदलवाड वय 21 वर्ष हा युवक शेतकरी सततच्या नापीकी व कर्जबाजारीपणाने हैराण  झाला होता. त्याच चिंतेला कंटाळुन दि. 19 रोजी सायंकाळी विषारी औषध प्रश्‍न केले. विषारी औषध प्राषण केल्याची बातमी शेजारील मित्रांना कळताच उमरी येथे  प्रथमोपचार करुन, नांदेड येथील खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरु असतं दि.20जूनच्या रात्री 8 च्या दरम्यान  प्राणज्योत मावळली. दि.21 जून रोजी मंडाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाचे वडील गेल्या दोन वर्षापुर्वी कर्क रोगाच्या आजाराने  दगावल्यामुळे कुंटुबांची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. निसर्गाच्या अवकृपेने व सततच्या नापीकीनी घराचा गाडा कसा चालवावा, बँकेचे कर्ज, बहीणींचे लग्न  आदी कारणामुळे काही दिवसापासुन तो बैचेन अवस्थेत होेता.या युवकाच्या कुटुंबियांना तातडीने मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी गावक-यातून केली जात  आहे.