Breaking News

गृहरक्षक दलातील जवानांचे कार्य कौतुकास्पद - शिंदे


उक्कलगाव - प्रतिनिधी 
श्रीरामपूर येथील शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये होमगार्डचे केंद्र नायक इस्माईल जहागिरदार यांच्या सेवासमाप्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे हे होते. यावेळी होमगार्डचे कार्य कौतुकास्पद असल्याचे तसेच होमगार्डना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. तसेच पोलिसांना होमगार्ड जवानांकडून अतिशय चांगले सहकार्य मिळत असल्याचे ते बोलत होते . यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केंद्र नायक इस्माईल जहागिरदार यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक मोहनराव भोसले, जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना अहमद भाई जहागिरदार, सामाजिक कार्यकर्ते अनिल भनगडे, ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, अशोक उपाध्ये, विजय शेलार, पोलीस कॉन्स्टेबल दुधाडे, कचरु चोथवे, मा. तालुका समादेशक डॉक्टर राज शेख, गंगाधर काकडे, कोपरगाव येथील तालुका समादेशक दादासाहेब कसबे, राजेश सोनवणे, नेवासा येथील श्रीकांत ससे, दिलीप गायकवाड, अशोक टेमकर, अल्ताफ शेख, अशोक चव्हाण, अरुण देवडे, गफ्फार शेख, संजय कनगरे, संगमनेर येथील मच्छिंद्र गाढे, वेणुनाथ बनकर, पत्रकार विठ्ठल गोराणे, राजेश बोरुडे, भरत थोरात, माळवे काका, कुणाल कांबळे, पांढरे, श्रीरामपूर येथील समन्वय अधिकारी शौकत एन. शेख, भास्कर जगताप, सर्फराज शेख, देवेंद्र कुलथे, समीर शेख, नाजीम पठाण, शफी शेख, चंद्रकांत नगरकर, वेणुनाथ पेठे, महाडिक आमले, गुंजाळ खरात, राजू शेठे, तांबे गरुड, राजू हरगुडे, अजहर तांबोळी, नासिर जहागिरदार, छबुलाल शेख, एकनाथ नरोडे, अशोक शिंदे, हुजेप जहागिरदार, नितीन बनकर, राहुल पेठे, यांच्यासह होमगार्ड, महिला होमगार्ड सुनिता खलिफे, आशा वैराळ, संगिता जगताप, शोभा थोरात, नसीम शेख, जरीना सय्यद, सीमा कुलथे, मालन वाघामारे, अनुसया शिंदे, आदीसह होमगार्डबांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती इस्माईल जहागिरदार यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आपण खूप गरिबीतून दिवस काढलेले आहे. देशाची सेवा करण्याची आवड असल्याने गृहरक्षक दलामध्ये भरती झालो होतो. आपण ही प्रयत्न केल्यास अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. सध्या अनेक समस्या होमगार्ड सैनिकांवर आलेले आहेत. असेही ते म्हणाले. व सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील धस व पञकार राजेंद्र देसाई यांनी केले. तर आभार शौकत एन शेख यांनी मानले.