Breaking News

धालवडीतील चव्हाण कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडुन सांत्वन


कुळधरण: प्रतिनिधी  
कर्जत तालुक्यातील धालवडी येथील अरुण चव्हाण यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शुक्रवारी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी धालवडी येथे येवुन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. चव्हाण यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे . चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पालकमंत्री व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी धालवडी येथे चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. महसूल विभागाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून चार लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. संजय गांधी निराधार योजनेतुन तसेच कृषी विभागाकडुनही अपघात विमा मिळण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचीत केले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, संजय खोडवे, भालचंद्र जगताप, मंगेश जगताप, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर, मंडल कृषी अधिकारी किसन तांदळे, तलाठी शेख, चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते. 
कृषी विभागाचा अपघात विमा
कृषी विभागाकडून कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेतुन दोन लाख रुपयांचे कुटुंबियांना आर्थिक सहाय्य केले जाते. घटना घडल्यानंतर ९० दिवसांच्या आत कागदोपत्रांची पूर्तता केल्यास आर्थिक मदत देण्यात येईल. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांनी दिली.