Breaking News

घरात वीज प्रवाह उतरल्याने पानेगावात एकाचा दुदैवी अंत


पानेगाव (प्रतिनिधी ) 
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे घरात वीज प्रवाह उतरल्याने सोपान सुर्यभान खडके यांचा दुदैवी अंत झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की सोपान सुर्यभान खडके (वय ४४) हे मुळा सहकारी साखर कारखाना येथून पावसातच कामावरुन घरी आले. त्यानंतर ओले कपडे बदलत असताना घराच्या पढविला बांधलेल्या तारीत विद्युत प्रवाह उतरल्याने ते तारीवरचा टाँवेल घेत असताना शाँक बसल्याने खाली कोसळले . हे त्यांची भावजयी तसेच शेजारी राहणारे गणेश चिंधे यांच्या लक्षात आले . त्यांनी गावात असणारा ट्रांन्सफाँर्मर तातडीने बंद केला . व त्यांना पुढील उपचारासाठी त्यांचे बंधू ज्ञानेश्वर खडके , गणेश चिंधे , सतिश जंगले यांनी मांजरी येथे नेले. तेथील डॉक्टरांनी श्रीरामपुर येथे जाण्याचे सांगितले . परंतु विद्युत प्रवाह मोठ्या प्रमाणावर बसल्यामुळे रस्त्यातच त्यांचा दुदैवी अंत झाला. त्याच दिवशी महावितरण नेवासा उपअभियंता यांना हि माहिती दिली आसता संबंधित विभागाचे कुणीही तिकडे फिरकले सुध्दा नाही . दुसऱ्या दिवशी महावितरणचे कर्मचारी आल्यावर प्रवाह तारीत उतरला कसा हे बघितले असता , कोटेशन केबल कट झाल्याने विद्युत प्रवाह तारीत उतरल्याने हा प्रकार झाल्याचे सांगितले. सोपान खडके हे मुळा कारखान्यात बाँयलर विभागात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, वडिल, भाऊ, भावजयी , पुतणे असा परीवार आहे . त्यांचा अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुळा कारखान्यात अतिशय शिस्तबद्ध कामगार म्हणून त्यांची ओळख होती. महावितरणच्या निकृष्ठ केबलमुळे खडके यांना आपला जिव गमवावा लागला.
चौकट - महावितरणने ग्राहकांना कोटेशन घेण्यासाठी ज्या केबल दिल्या आहेत , त्या अतिशय निकृष्ठ असून हा सर्वस्वी महावितरणचा हलगर्जीपणा आहे.
दत्तात्रय घोलप , पानेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष.