अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करावी करा
शहराच्या चारही बाजूने असलेल्या रस्त्यावर, मुस्लिम ट्रस्टच्या जागांवर, स्मशानभूमीची जागा व सरकारी जागेवर, मागील काही दिवसांमध्ये अतिक्रमण करून ती बळकावण्यात चढाओढ लागली असून, याविरुद्ध कर्जत नगरपंचायतच्या विरोधी पक्ष नेत्या पुजा संतोष मेहेत्रे यांनी विविध स्तरावर तक्रार करत ही अतिक्रमणे काढून टाकावीत अशी मागणी केली आहे. याबरोबर याकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करणार्या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी, प्रांता धिकारी व तहसीलदार व बांधकाम विभागाचे उपअंभियंता यांचेवर ही कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
कर्जत शहरातून जाणार्या नगर, राशीन, बर्गेवाडी, वालवड व करमाळा या चारी बाजूच्या रस्त्यांवर कर्जतमधील काही मंडळींनी रात्रीतून अतिक्रमणे करून शेकडो टपर्या उभ्या करण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये कर्जत शहरातील शासकीय व देवस्थानच्या जागा, मार्केटयार्ड सभोवतालची जागा, लिंगायत समाज स्मशानभूमीची जागा व मुस्लिम ट्रस्टची जागा या ठिकाणी रात्रीतून शेकडो टपर्या उभ्या राहिल्या आहेत. या प्रकारामुळे कर्जत शहरातील नागरिकासमोर विविध समस्या उभ्या राहणार असून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. लोकांना जाणे येणे, वाहन चालविणे, शाळेत जाणे, व वाहतुकीस फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. याचे स्वरूप इतके गंभीर आहे की, ज्याचे वर्णन एखादी घटना घडल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्षा यांनी नगर पंचायतीची त्वरित विशेष बैठक बोलवावी, संबंधित खात्याचे सर्व अधिकारी बोलावून अतिक्रमणे जमिनदोस्त करावीत व अशी अतिक्रमणे करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे लेखी तक्रारीत कर्जत नगरपंचायतच्या विरोधी पक्ष नेत्या पुजा संतोष मेहेत्रे यांनी म्हटले आहे. यांच्याप्रति जिल्हाधिकारी व इतर शासकीय यंत्रणांना दिल्या असून याबरोबरच या अतिक्रमनाकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करणार्या नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांचेवर ही कार्यवाही करावी अशी मागणीही मेहेत्रे यांनी केली आहे.
कर्जतच्या मुख्य रस्त्यावरील देवस्थान जागेच्या खोट्या नोटरी करून जमिनीची विक्री करून देणारा जहांगीर शेख व कुटूबींय यांची प्रशासनाने चौकशी करून इनामी व देवस्थानची स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विक्री करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कर्जतचे तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, व सार्वजनीक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी त्याच्या कर्तव्यात कसूर करून अतिक्रमण करणार्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची खाते निहाय चौकशी करून कारवाई करावी.
- पुजा मेहेत्रे, विरोधी पक्षनेत्या, कर्जत नगरपंचायत