सर्वोदय विदया मंदिर खिरविरेचे बोर्ड परीक्षेत यश बारावी 91.20 टक्के तर, दहावीचा 98.03 टक्के
त्याचप्रमाणे इ.10 वीचा बोर्ड परिक्षेचा निकाल 98.03 टक्के लागला असून, यामध्ये कुंडलीक सुर्यवंशी याने 91.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच दिपिका बेणके हिने 90.20 टक्के गुण मिळवून द्वितिय क्रमांक मिळविला. तर ऋतिका भांगरे हिने 87.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य अंतुराम सावंत, संपत धुमाळ, दिपक पाचपुते, शशिकांत कुलकर्णी, भरत भदाणे, कविता वाळुंज, नानासाहेब शिंदे, धनंजय लहामगे, भाऊसाहेब कोते, प्रा. रामदास डगळे, प्रा. सचिन लगड, प्रा. विक्रम आंबरे, प्रा. योगेश शिंदे, प्रा. शशिकांत चौधरी, प्रा. गोविंद पांडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. संगिता भांगरे, लिपिक भास्कर सदगिर आदींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा तसेच सर्व सन्मानिय संचालक मंडळ आदींनी आभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.