Breaking News

पर्यावरण रक्षणाची नागरिकांनी घेतली शपथ


अहमदनगर । दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्या मागचा मुख्य हेतू आहे.मात्र नगरमधील डॉ प्रकाश व सुधा कांकरिया हे गेली 25 वर्षे हे कार्य नित्य नियमाने करत आहे व आज ते साईबन म्हणून प्रसिद्ध झाले आहे.