Breaking News

बहुजन बनलाय अँटीनाच्या लहरींचा गुलाम

 ज्यकर्ते नावाची जमात कुठलीही असली तरी अ‍ॅन्टीनाच्या कुशाग्र लहरींचा प्रभाव राजसत्तेवर कायम राहिल्याचा इतिहास आहे. आजपर्यंत भारतभूमीवर झालेल्या आंदोलनांचा इतिहास चाळल्यानंतर पुन्हा हाच निष्कर्ष निघतो. एकाच वेळी एका हाताने राजसत्ता आणि दुसर्‍या हाताने जनसत्तेचे मुंडके दाबण्याचे कसब साधणारा हा वर्ग ङ्गप्रभूफ सत्ता अबाधित ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. स्वातंत्र्यपुर्व भारतातील सामाजिक चळवळ असो नाही तर स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध जनसामाजिक आंदोलने असोत, नेतृत्वाची शेंडीही त्यांच्याच हातात. ज्यांच्याविरूध्द आंदोलन पेटविले तेही त्यांचेच जातबांधव. उद्देश एकच, बहुजनांना सतत कुठल्या न कुठल्या मुद्द्यावर पेटवायचे, लढवायचे आणि त्यांचे लक्ष अशा अनुत्पादित मुद्द्यांवर जखडून ठेवायचे, त्यांची उर्जा त्यातच खर्ची पाडायची आणि इकडे आपला कार्यभार उरकून घ्यायचा, अशीच त्यांची आजवरची कार्यपध्दती राहिली आहे. आम्ही बहुजन त्यांच्या कार्यपध्दतीला बळी पडून आमच्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत याचे भान मात्र आम्हाला आज 21 व्या शतकातही येत नाही. हेच खरे तर दुर्दैव आहे. अगदी कालपरवाच्या हैद्राबादच्या रोहित वेमुला प्रकरणात पेटलेले आंदोलन असो नाही तर शनीच्या मागे महिलांची पिडा लावणे असो. ह्या सार्‍या उद्योगांमागे अ‍ॅन्टीनाच्या लहरीच कारणीभूत आहे हे बहुजनांनी समजून घ्यायला हवे. आम्हा बहुजनांवर प्राचीन हिंदू धर्माचा पगडा आहे. असंख्य बहुजनांच्या भावना धर्मतत्वांशी समरस झाल्या आहेत. या भावनांना जरासा तडा गेला तरी बहुजन पेटून उठतो ही बहुजनांची कमजोरी या मंडळींनी बरोबर हेरली आणि हीच दुखरी नस वारंवार दाबून बहुजनांच्या भावना पेटवत ठेवण्याचे काम या वर्गाकडून केले जात आहे. खरा धर्म कोणता? हे मात्र बहुजनांना त्यांनी कळू दिले नाही. बहुजनांनीही आपल्या ज्ञानाचा वापर करून तो समजून घेण्याची तसदी घेतली नाही. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या हिंदू धर्मात अनेक चालीरिती, रूढी परंपरा आहेत. पुर्वांपार चालत आलेल्या या चालिरिती, रूढीपरंपरांच्या साखळदंडात जखडून ठेवण्याची व्यवस्था मोडकळीस येणार नाही. अशाच पध्दतीने ब्रम्हवृंदाने परिस्थिती निर्माण केली. याच व्यवस्थेने बहुजनांना ब्रम्हवृंदाचे धार्मिक आणि भावनिक गुलाम बनण्यास भाग पाडले. जेंव्हा बहुजनांकडून या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा तेंव्हा धर्म अडचणीत आल्याची आवई या मंडळींनी उठविली. रूढी परंपरांना आव्हान म्हणजे धर्मद्रोह असी वातावरण निर्मिती करून धर्माचा ठेका हातातून सुटणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. प्रत्यक्षात जेंव्हा जेंव्हा बहुजनांनी चालिरिती झुगारल्या तेंव्हा तेंव्हा धर्म बुडाला तर नाहीच उलट अधिक जोमाने उजळला हे इथे आवर्जून लक्षात घ्यायला हवे. आपल्या हिंदू धर्मात हजारो वर्षापासून महिलेला सती पाठविण्याची आणि विधवेचे केशवपन करण्याची प्रथा होती. राजाराम मोहन रॉय यांनी या प्रथेविरूध्द आवाज उठविला. तेव्हांही या धर्माच्या ठेकेदारांनी धर्म बुडीत निघेल अशी कोल्हेकुई सुरू केली होती. बालविवाह लावणे, त्यानंतर पतीच्या अकाली  निधनानंतर पुनर्विवाह करण्यास अटकाव या प्रथांनाही हजारो वर्षांची परंपरा होती. त्याही मोडीत निघाल्या मग धर्म बुडाला का? याचे मंथन बहुजनांनी करायला हवे. हजारो वर्षाच्या क्लिष्ट परंपरा मोडीत निघूनही धर्म आहे तिथेच आहे. उलट उजळून निघाला आहे. मग सध्या सुरू झालेले शनी दर्शनाचे तांडव नृत्य कशासाठी? महिलांनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले तर शनीचा कोप होईल? ज्या योनीतून मानव जन्माला आला, नव्हे शनीची उत्पत्तीही योनीतूनच, त्याच योनीचा विटाळ कसा? या प्रश्‍नांची उत्तरे कुणी द्यायची? (क्रमशः)