Breaking News

संघटनेच्या दृृष्टीकोनातून अ‍ॅपचा उपक्रम कौतुकास्पद

महापौर सुरखा कदम यांनी जो अ‍ॅप तयार केला आहे. तो शिवसेनेसाठी दिशादर्शक असा आहे. या अ‍ॅपमध्ये त्यांनी फक्त कामाच्या तक्रारी नव्हे तर विविध विकासाकामांच्या घडामोडी व नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे आदिंचा यामध्ये सहभागी केला आहे. संघटनेच्या दृृष्टीकोनातुन या अ‍ॅपमध्ये आणखी नवनवीन बदल करुन तो सर्वसामान्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याशी संपर्क ठेवला जाईल. या अ‍ॅपची निर्मिती म्हणजे नगरकरांना एक नवीन पर्वणी आहे. अ‍ॅपचा उपक्रम हा खरोखरच कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले. 

महापौर सुरेखा कदम यांनी तयार केलेल्या अ‍ॅपचे उद्घाटन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपमहापौर अनिल बोरुडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, गणेश कवडे, संभाजी कदम, विक्रम राठोड, योगिराज गाडे, नगरसेविका मनिषा बारस्कर, आशा निंबाळकर, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, उषा ओझा, सुष्मा पडोळे, दत्ता मुदगल, सुरेश तिवारी, शरद ठाणगे, अशोक दहिफळे, हर्षवर्धन कोतकर, पारुनाथ ढोकळे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, रावजी नांगरे, विजय पठारे, दशरथ शिंदे आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले कि, आज स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल असतात म्हणुन या अ‍ॅपचा नगरवासींना खुप मोठा फायदा होणार असून आपल्या तक्रारी ते या अ‍ॅपव्दारे आमच्या पर्यंत पोहचवु शकातात. महापौर सुरेखा कदम यांच्या संकल्पनेतुन या अ‍ॅपची निर्मिती झाली. या अ‍ॅपमुळे जनतेच्या विविध प्रश्‍नांना वाचा फुटेल व त्यांचे प्रश्‍ना खर्‍या अर्थाने मार्गी लागतील. शिवसेना हि नेहमीच नगरच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. त्यामुळेच आम्ही जनतेच्या प्रश्‍न तात्काळ मार्गी लावणारा पक्ष म्हणजेच शिवसेना.
यावेळी महापौर सुरेखा कदम यांनी या अ‍ॅपची माहिती उपस्थित असलेल्या सेनेच्या पदाधिकार्यांना सांगितली. व नगरकरांनी या अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करावा. जेणेकरुन तुमचे प्रश्‍न आमच्याकडे पोहचुन ते मार्गी लावण्यास मोठी मदत मिळेल. शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी व नगरच्या जनतेला वेळेत अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्यांची तक्रारींची तातडीने दखल घेतली जावी व त्यावेळेत मार्गी लागव्यात यासाठीच हा अ‍ॅप विकासिक करण्यात आल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. या अ‍ॅपची निर्मिती सुमित कटारिया व दर्शन गांधी यांनी केली.