बँकेचे संस्थापक स्व. ओंकारनाथ मालपाणी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर मर्चंटस् बँकेच्या मोबाईल बँकींग सेवेचा शुभारंभ आज संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात डॉ. मालपाणी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणींसह उद्योजक वैभव शहा, डॉ. प्रविण पानसरे, बँकेचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी, चेअरमन प्रकाश राठी, व्हाईस चेअरमन गुरुनाथ बाप्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम आदी उपस्थित होते. कार्यक्रमास माजी चेअरमन बिहारीलालजी डंग, डॉ अशोक पोफळे , डॉ अरविंद रसाळ, ओंकारनाथ भंडारी, जसपाल डंग यांच्यासह बँकेचे अनेक आजी-माजी संचालक, सभासद, हितचिंतक, ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.