मुंबईत रात्रभरापासून पावसाची तुफान बॅटिंग
मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय आहे. नवी मुंबई, अंधेरी, गोरेगाव, वसई, विरार भागातही जोरदार पाऊस सुरु आहे.
या दरम्यान पाणी भरल्यामुळे सकाळी ऑफिससाठी निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच पंचाईत होतेय. सायन स्टेशनवर एक्सप्रेस, आणि लोकल ट्रेन ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावताना दिसतायत. रस्त्यावर पाणी असल्याने काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे तिन्ही मार्गावरच्या रेल्वे धिम्या गतीने आहेत. 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे.