फीफा वर्ल्डकपसाठी रशियामध्ये फुटबाॅलप्रेमींनी एकच दर्दी गर्दी केलीये. पण याच वर्ल्डकपचं रिपोर्टिंग करत असलेल्या महिला रिपोर्टरसोबत छेडछाड झाल्याची लज्जास्पद घटना घडलीये.जूलिएथ गोंजालेज थेरन ही महिला एका जर्मन टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टिंग करत होती. लाईव्ह रिपोर्टिंग चालू असतानाच एका फुटबॉल चाहत्यानं या महिला रिपोर्टरसोबत छेडछाड केली आणि तो तेथून निघून गेला. लाईव्ह रिपोर्टिंग सुरू असल्यानं हे सगळं दृश्य कॅमेरात कैद झालंय.