Breaking News

वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपण


येथील नगर तालुक्यातील मदडगाव शिवारामध्ये वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत तब्बल 161 वृक्ष लागवड करुन लक्ष्मण कुलट यांनी समाजिक बांधिलकी जपली आहे.वृक्षलागवड ही काळाची गरज असुन पर्यावरणाला आपण काही तरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाने आपल्या मनात रुजवुन निसर्गासाठी काहीतरी करुन त्याचे ऋण फेडणे गरजेचे आहे असे मत कुलट यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी लक्ष्मण तुकाराम कुलट ,पै सुनिल कदम,उद्योजक पै विलास कुटे, शरद शेडाळे,बाळासाहेब आठरे मेजर ,रावसाहेब मुंगसे,अविनाश पाचारे,आदि उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान बोलताना पै सुनिल कदम म्हणाले निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरुन देत असतो मात्र आपण निसर्गाकडुन फक्त घेत असतो निसर्गाच्या सानिध्यात वावरताना आपल्याला निसर्ग रम्य वातावरण हवे असते मात्र त्यासाठी आपण यासाठी आपल्यापासुन सुरवात केली तर तो आनंद वेगळाच असतो वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील ऐक वर्ष कमी करणारा दिवस असतो आपण त्यासाठी पार्टी व ईतर खर्च टाळत निसर्गासाठी नव्हे तर आपल्यासाठी किमान एक झाड लावले तर आयुष्याच्या वयामध्ये नक्कीच भर पडेल असे मत व्यक्त केले.