Breaking News

अधिक मासानिमित्त त्रिदिनी संकिर्तन महोत्सवाचे आयोजन

\अकोले तालुका वारकरी संघटना व खंङेश्‍वर देवस्थान ट्रस्ट म्हाळादेवी यांच्या संयुक्त नियोजनाचे श्री क्षेत्र खंङेश्‍वर देवस्थान, म्हाळादेवी येथे पुरूषोत्तम मास (अधिक मास) या पुण्यपर्वकाळात भव्य त्रिदिनी संकिर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खंडेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा म्हाळादेवीचे उपसरपंच प्रदिप हासे यांनी केले.

दि. 8 जून रोजी संध्या 7 ते 9 हभप ङॉ. सुदाम महाराज पानेगावकर, दि. 9 जून रोजी हभप महादेव महाराज राऊत, दि. 10 जून रोजी हभप संजय महाराज धोंडगे व दि. 11 जून रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत जगद्गुरू व्दाराचार्य महामंङलेश्‍वर हभप डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. 
या कार्यक्रमात म्हाळादेवी गावातील लेकी जावयांचा यथोचित मानसन्मान व स्नेहभोजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील सर्व वारकरी सहभागी होणार आहेत वारकरी संघटनेचे हभप विश्‍वनाथ महाराज शेटे, आत्माराम महाराज शेळके, शांताराम महाराज पापळ, कैलास महाराज आहेर, बाळासाहेब महाराज भांगरे, रामचंद्र महाराज वावळे, भिमराज महाराज भांगरे, अमोल महाराज भोत, गायनाचार्य तुकाराम महाराज आरोटे, राजेंद्र महाराज नवले, चंद्रकांत महाराज चौधरी, अरूण महाराज शिर्के, नितिन महाराज गोङसे, संदिप महाराज सावंत, इंद्रभान महाराज कोल्हाळ, रामकृष्णहरी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, हभप बाळाराम महाराज रंधे यांचे विशेष सहकार्य राहणार आहे. गुरूवर्य हभप रामनाथ महाराज जाधव, गुरूवर्य मनोहर महाराज भोर, महंत हभप विवेक महाराज केदार यांच्या नेतृत्वाखालील या भव्य त्रिदिनी संकिर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा म्हाळादेवी ग्रामस्थ व अकोले तालुका वारकरी संघटना व म्हाळादेवी पंचक्रोशीच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष तथा म्हाळादेवी येथील खंडेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदिप हासे यांनी केले आहे.