Breaking News

गणेशोत्सवाच्या वर्गणीची रक्कम एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी !

अहमदनगर, दि. 24, ऑगस्ट - गणेशोत्सव वर्गणीतील जमा झालेल्या रकमेतून मोठी गणेशमुर्ती,मोठा देखावा, महाप्रसाद याचा खर्च केला जातो.विसर्जनाच्या दिवशी  मोठा डी़ जे़ लावून हिंदी गाण्यांवर नाचण्याचे चित्र आता नवे राहिले नाही़ उत्सवात जमलेल्या रकमेतून सामाजिक कार्य न करता समाजास बिघडविण्याचे काम मात्र  आपण बघितले आहे़.मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ़ मधुकर वाकचौरे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवातील  वर्गणीची रक्कम एड्सग्रस्त मुलांच्या मदतीसाठी देऊन समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे़ 
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव वर्गणीतून 13 हजार रूपये जमा केले़.मात्र जमा केलेल्या वर्गणीतून डी़ जे़ आणि  अनावश्यक खर्च करण्या ऐवजी सामाजिक प्रश्‍न सोडविण्याचा विचार विद्यार्थ्यांनी डॉ़ एम़ आर.वाकचौरे यांच्याकडे मांडला़.त्वरीत या सर्व टीमने एच.आय.व्ही.संक्रमित  मुलांचे पुनर्वसन करणा-या खांडगांव येथील संतोष पवार यांच्या स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्थेकडे संपर्क साधला.35 ते 40 एडसग्रस्त लहान मुलांच्या  संगोपनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो़.या मुलांना चांगले संस्कार,अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण व मनोरंजन या मुलभूत गरजा मिळणे आवश्यक  आहे़.या सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांनी दरवर्षीच्या परंपरेला फाटा देत सदर रक्कम या गरजू मुलांना देण्याचे ठरविले व समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित  केला़.सर्व विद्यार्थ्यांनी ही कल्पना संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे यांच्यापुढे मांडली़.त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले़ स्वयंप्रेरितचे संतोष पवार यांच्याकडून  संस्थेच्या कामकाजाविषयी आणि कार्याविषयी शिंदे यांनी माहिती घेतली़. या उत्कृष्ट अशा सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी अनिल शिंदे यांनी अमृतवाहिनी शेती  व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने 8 हजार रूपयेचा धनादेश व मुलांच्या वर्गणीचे 13 हजार ,अशी एकुण 21 हजार रूपयांची रक्कम अमृतवाहिनीच्या संपूर्ण टीमने  संतोष पवार यांच्याकडे सुपूर्त केली़.अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही ब्लड हेल्पलाईन,स्वच्छ-सुंदर संगमनेर,दंडकारण्य अभियान, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून  सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे़.संस्थेचे अध्यक्ष माजी महसुलमंत्री आ.बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आमदार डॉ़ सुधीर तांबे,शरयु देशमुख यांनी सर्व  विद्यार्थ्यांचे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़.एम़.ए़. व्यंकटेश,उपप्राचार्य प्रा़.ए.के.मिश्रा,रजिस्ट्रार प्रा़.विजय वाघे तसेच सर्व  विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.