Breaking News

मोफत साडीचे आमिष दाखवून महिलेला 50 हजाराला गंडा


पुणे, दि. 14, मे - मोफत साडीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ महिलेला 50 हजाराला गंडा घालण्यात आला. ही घटना नानापेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी तुळसा आडेप या भाजी मंडईतून घरी चालल्या होत्या. यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने एका धर्मातील एकाला बारा वर्षानंतर मुलगा झाला आहे. यामुळे तो मोफत साडी वाटप करत असल्याचे सांगितले. त्याच्या आमिषाला फिर्यादी भुलल्या. यानंतर त्याने त्या धर्मात मंगळसूत्र चालत नाही, असे सांगून त्यांना मंगळसूत्र कागदात बांधून जवळील पिशवीत ठेवण्यास सांगितले. यानंतर त्याच्या दुसर्‍या साथीदाराने येऊन लवकर चला कार्यक्रम संपेल असा बहाणा केला. दरम्यान त्या दुसर्‍या मुलाला त्यांनी बोलण्याच्या नादात 200 रुपये काढून दिले. यानंतर त्याने बिस्कीटचा पुडा पिशवीत ठेवण्याचा बहाणा करत पिशवीतून मंगळसूत्राची पुडी चोरली. थोड्या अंतरावर गेल्यावर दोघांनीही धुम ठोकली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव तपास करत आहेत.