Breaking News

विषारी ताडी जप्त; 1 अटकेत


नगर कल्याण रोडवरील विठ्ठल मंदीराजवळील बाभळीच्या आडोशाला विषारी ताडी विक्री करणार्‍या एकास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची 80 लिटर पांढरी रंगाची विषारी भेसळयुक्त ताडी हस्तगत करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात नालेगाव परिसरातील बारवेजवळ विषारी ताडी विक्री करणार्‍यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात विषारी ताडी विक्रीचा प्रकार झाला. यातुन अन्य ठिकाणीही ही विकली जात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.