देशातील पहिले बांबू संशोधन केंद्र चंद्रपुरात
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरू होणार आहे. या केंद्राची इमारत ही बांबूपासून बणविण्यात येणार आहे. अशाप्रकारे बांधली जात असलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत असून, देशातील हे पहिले बांबू संशोधन केंद्र असणार आहे. चंद्रपुरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना वनविभागाच्या वतीने 2014 मध्ये झाली. या केंद्रामध्ये युवक-युवतींना बांबूपासून निर्माण होणार्या विविध कलाकृतींचं प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच येथे राज्यातील विविध बांबूच्या प्रजातींवर संशोधन केलं जाणार आहे. सध्या हे केंद्र छोट्या स्वरुपात चंद्रपुरात सुरू करण्यात आले आहे. मात्र, ते पूर्णरुपात सुरू होण्यासाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
चंद्रपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथे हे बांबू केंद्र आकार घेत आहे. तीन एकर जागेत हे केंद्र तयार होत असून, यात प्रशिक्षण इमारत, प्रशासकीय इमारत, अधिकारी-कर्मचार्यांची निवासस्थाने आणि वसतिगृहे असणार आहेत. यातील प्रशिक्षण इमारत आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे पूर्णपणे बांबूचे आहे. यासाठी आसाम आणि बंगालमधील सिलिगुडी येथून बांबू मागवण्यात आले आहेत. या दोन्ही इमारती पर्यावरणपूरक असून यावरील छतसुद्धा वेगळ्या पद्धतीचे असणार आहे.