‘पद्मश्री डॉ. विखे’मध्ये ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र सुरू
प्रवरानगर प्रतिनिधी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने लोणी येथील पद्मश्री डॉ विखे पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून {दि. २०} ऑनलाईन प्रवेश सुविधा आणि मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य मनोज परजणे यांनी दिली. ते म्हणाले, व्यावसायिक शिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया आजपासून {दि. २१} सुरू झाली आहे. द्वितीय वर्षासाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि. २५ जूनपासून सुरू होणार आहे. राहाता तालुक्यामध्ये केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष केंद्रीभूत प्रवेश नोंदणी प्रक्रियेसाठी प्रवरानगर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रामध्ये तज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे.