Breaking News

चितळे बंधू : कामगारांचा पगारवाढीवरुन उपोषणाचा इशारा

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्या कारखान्यात काम करणा-या 70 ते 72 कामगारांनी पुन्हा एकदा पगारवाढीवरून  प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे.गेल्या 15 ते 16 वर्षांपासून चितळेंच्यादुकानात कायम स्वरूपी काम करणा-या 70 ते 72 कामगारांनी पगारवाढीवरून काही  दिवसांपूर्वी कामबंद आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यानंतर यांच्यातील काही कामगारांना 2 ऑगस्ट रोजी नोटीस लावून 3 ऑगस्टपासून निलंबीत करण्यात येत  असल्याची नोटीस देण्यात आली होती.तसेच महिला कामगरांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली  असून पोलीस आयुक्तांनाही या विषयी पत्र देण्यात आले आहे. तसेच या विषयीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात येणार आहे. यावर त्त्वरीत कारवाई न झाल्यास  आम्ही चितळे बंधू यांच्या कारखान्यासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.