Breaking News

त्या "विजय"ला पाठीशी घालण्याचा अधिकाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा पंचायत समितीतील ई निविदातील सावळा गोंधळ दैनिक लोकमंथन ने चव्हाट्यावर आणल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाबरोबर पंचायत समितीतही चांगलीच खळबळ उडाली आहे . या सर्व प्रकारातून वाचण्यासाठी त्या "विजय "ची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. 

याबाबत अधिकची मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामसेविका तापकीर यांची मागील सहा महिन्यापूर्वी प्रशासकीय बदली झाली. त्यांनी रीतसर आपला कार्यभार सोडला असताना देखील, पंचायत समितीत कोणत्याही शासकीय अधिकार नसताना नगर येथील विजय पठारे नावाचा व्यक्ती ईनिविदेच्या कामासाठी नियुक्त केला आहे. या विजयने अधिकारी व पदाधिकारी यांना चांगलीच भुरळ पाडली असल्यामुळे, ते म्हणतील तश्याच प्रकारे ईनिविदा होतात. असाच घोळ कोकणगाव येथील ईनिविदेत हि झाला आहे. बदली झालेल्या ग्रामसेविकेच्या नावाने असलेल्या डिजिटल स्वाक्षरीने कोकणगाव ची निविदा प्रसिद्ध केली. पण आता निविदा उघडण्यासाठी पुन्हा त्या ग्रामसेविकेची डिजिटल स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. परंतु ती स्वाक्षरी मिळत नसल्यामुळे ते काम पुन्हा रिटेन्डर करण्याशिवाय पंचायत समितीसमोर पर्याय उरला नाही. पण यातून दलित वस्त्यांच्या होणाऱ्या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. यांचेशी संबधित व्यक्तीला काहीच घेणे देणे नाही आहे. 

याच कामाबाबत समाजकल्याण सभापती उमेश परहर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या विषयांवरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. तरी सुद्धा त्या "विजय"ला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न पंचायत समिती करताना दिसत आहे.