‘आत्मा मालिक’च्या विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
कोपरगाव ता. प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या १० विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. या निवडीबद्दल आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी आणि कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी सुधाकर मलिक, अकॅडमीक विभाप्रमुख नागेश गायकवाड, प्राचार्य दिनकर राउत, योगेश गायके आदी उपस्थित होते.
पोलिस उपनिरीक्षकपदी अखिलेश बोंबे (रूई, ता. राहता), चिंतामन जाधव (कोपरगांव), कृष्णा सांळुके (हदियाबाद, ता. गंगापूर), अभय ढाकणे (तारवाडी, ता. नेवासा), किशोर सरवर (गोंडेगाव, ता. नांदगाव), विलास जाधव (कारवाडी, ता. सिन्नर), अविनाश दहिफळे (अंतरवाळी बु, ता. शेवगाव), कर्मराज गावडे (मु. बेनवडी, सातारा), संग्राम गावडे (मु. बेनवडी, सातारा) व महेंद्र सुर्यवंशी (कौदाणे, कर्जत) या विद्यार्थ्याची निवड झाली.
यावेळी बोलताना आश्रमाचे अध्यक्ष सुर्यवंशी म्हणाले, आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत १५० विद्यार्थ्यांची विविध अधिकारी पदावर निवड झाली. हे सर्व अधिकारी निःस्पृहवृत्तीने समाजाची व देशाची सेवा करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, अभय ढाकणे, दुर्योधन दहिफळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले. नागेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीचे संदिप भागवत, योगेश चव्हाण, निलेश फरताळे, साईनाथ चौधरी यांनी परि श्रम घेतले. सुधाकर मलिक यांनी आभार मानले.