Breaking News

विद्यार्थ्यांनी चतु:सूत्रीचा अवलंब करावा : पालवे

प्रवरानगर प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते. मात्र त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते, यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चितीवरच भावी आयुष्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांना खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. यासाठी त्यांनी खडतर परिश्रम, योग्य मार्गदर्शन, नशिबाची साथ व स्पर्धात्मक वातावरण या चतु:सूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले. येथील के. आर. जोंधळे कृषी व ग्रामविकास सेवाभावी संसंस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव व शिष्यवृत्ती वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी निमगावजाळी सोसायटीचे चेअरमन ठकाजी थेटे होते. प्रारंभी प्रास्ताविक मंत्रालय उपसचिव सतीषराव जोंधळे साहेब यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी सागर मिनानाथ जोंधळे, आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल वैभव डेंगळे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्तीप्राप्त व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास जि. प. चे कृषी अधिकारी प्रमोद साळवे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त सागर मिनानाथ जोंधळे, आरटीओ इन्स्पेक्टर वैभव डेंगळे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य रविंद्र रसाळ, उद्योजक शिरीष डेंगळे, उद्योजक अशोक वदक यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच अमोल जोंधळे, के. आर जोंधळे कृषी व ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील डेंगळे, मच्छिंद्र थेटे, राजे शिवाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जोंधळे, दत्ता जोंधळे, योगेश जोंधळे, दिलीप डेंगळे, रमेश थेटे, नानासाहेब डेंगळे, विलास जोंधळे, बी. जी. जोंधळे, मिनानाथ जोंधळे, किरण पाचोरे, हेमंत तांदळे, पारितोषिकप्राप्त विद्यार्थी, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.