Breaking News

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शाखाधिकाऱ्यास अखेर अटक


बुलडाणा : पीक कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे यास पोलिसांनी सोमवारी नागपूर जिल्ह्यात अटक केली. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेत एक शेतकरी त्याच्या पत्नीसह पीक कर्जाच्या मागणीसाठी गेला असता शाखाधिकारी राजेश हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीस शरीर सुखाची मागणी केली होती. यासंदर्भात पीडित महिलेने मोबाइलवरील त्याचे संभाषण रेकॉर्ड करून तक्रार दाखल केली होती.