पीएनबी घोटाळा : 107 कंपन्यांची चौकशी
नवी दिल्ली : कोट्यवधींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी 107 कंपन्या व 7 सीमित दायित्व भागीदारी संस्थांची (एलएलपी) चौकशी सुरू आहे. सहकार, कायदा व न्याय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सांगितले, की कंपनी अॅक्ट 2013 कलम 212(1)(सी) आणि सीमित दायित्व भागीदारी अॅक्ट 2008 कलम 43(3)(सी)(आय) अंतर्गत गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयातर्फे (एसएफआयओ) संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यात येईल. यासोबतच फायरस्टार डायमंड ग्रुपचा मालक नीरव मोदी व गीतांजली ग्रुपचा मालक मेहूल चोक्सी यांच्या मालकीच्या कंपन्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.