Breaking News

सोन्याच्या दरात वाढ


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सोनच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याचे दर तब्बल32,000 रूपयांच्याही पुढे पोहचले आहेत. मुंबईत बुधवारी सोन्याचा दर दहा ग्रामसाठी 32,171 रूपये एवढा आहे. डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तसेच स्थानिक सराफांकडूनही सोन्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहे. गेले अनेक दिवसा सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने मध्यमवर्गीयांमध्ये याबाबत नाराजी दिसून येत आहे.