Breaking News

वरळीमध्ये पोलिस वसाहतीत छताचा स्लॅब कोसळून पोलिसाची पत्नी गंभीर जखमी

एकीकडे शहर सुरक्षित राहावं यासाठी मुंबई पोलिस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतो, पण पोलिसांचं कुटुंबच कितपत सुरक्षित आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. वरळीतील पोलिस वसाहतीत छताचा स्लॅब कोसळून पोलिसाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

पोलिस ज्या घरात राहतात, ती जास्तीत जास्त दोनशे स्क्वेअर फुटांची आहेत, पण त्यातही ती मोडकळीस आलेली आहेत. याचाच फटका पोलिस कुटुंबीयांना बसत असल्याचं वारंवार समोर येत आहे. बीडीडी चाळ क्रमांक 28 पोलिस वसाहतीत एका महिलेवर स्लॅब कोसळून ती गंभीर जखमी झाली. वंदना कदम असं जखमी महिलेचं नाव आहे.