Breaking News

९ नाेव्हेंबरपासून महिलांचा टी-२० वर्ल्डकप रंगणार!


दुबई यंदा क्रिकेट चाहत्यांचा दिवाळीचा उत्सव काहीसा द्विगुणित हाेणाार अाहे. कारण याचदरम्यान पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान महिला संघांमध्ये सामना हाेईल. नाेव्हेंबरमध्ये विंडीजमधील महिलांच्या टी-२० वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. ११ नाेव्हेंबर राेजी या दाेन्ही संघांत काट्याची लढत रंगणार अाहे. त्यामुळे दिवाळीत चाहत्यांना फटक्यांची अातषबाजी करून अापला जल्लाेष साजरा करण्याची संधी अाहे.