निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ
मुंबई : जेजे रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी पुकारलेले आंदोलन तिसर्या दिवशीही सुरू आहे. सोमवारी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत डॉक्टरांची याबाबत बैठक असल्याची माहिती मिळते आहे.सर जेजे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या मा हितीनुसार, शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्यावेळी रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना दु:खद असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत डॉक्टरांची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. सुरक्षारक्षक पुरवण्याबाबत कुठलाही तोडगा या बैठकीत निघाला नाही. मात्र गिरीष महाजन यांनी आम्ही डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत सुरक्षारक्षक पुरवण्यात येत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे डा ॅक्टरांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, की डॉक्टरांवर झालेला हल्ला निषेधार्य आहे. या पूर्वी डॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत.आता रुग्णालयात अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही लावण्यात येतील असेही महाजन म्हणाले. ही सर्व व्यवस्था एका महिन्यात करण्यात येईल. डॉक्टर आज कामावर रुजू होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सायंकाळी सरकारची एक समिती रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेणार आहे.