Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड


प्रवरानगर प्रतिनिधी 

येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी महाविद्यालय लोणी येथे अर्थकेअर इक्युपमेंट प्रा. लि., पुणे येथील कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या अंतिम फेरीमध्ये नोकरीसाठी १६ विद्यार्थ्यांची नी निवड झाली आहे, अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागाचे समन्वयक प्रा. अमोल सावंत यांनी दिली.

या १६ विद्यार्थ्यांमधून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अजय उजगरे आणि व्यवसाय व्यवस्थापनमधील राहुल गिते यांची सेल्स एक्झ्युक्युटिव्ह या पदावर निवड करण्यात आली. या नामांकित कंपनीत रुजू होतांनाच या विद्यार्थ्यांना ३ लाखांचे वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. या मुलाखतीच्या आयोजनासाठी ट्रेनिंग प्लेसमेन्ट समन्वयक प्रा. अमोल सावंत, प्रा. विक्रम राऊत व प्रा. सत्यन खर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विद्यर्थिनींच्या यशाबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, व्यवसाय व्यवस्थापनचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.