Breaking News

दीपक सांवत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही : सांवत

मुंबई - पक्षाने मला गेली 18 वर्ष मुंबई पदवीधर संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आता मंत्रीपदी असताना पक्षाने माझ्या ऐवजी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा भावना आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केल्या.



दीपक सावंत म्हणाले, पक्षाने तिकीट नाकारल्याने मला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाने गेली 18 वर्ष मला मुंबई पदवीधर संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. आता पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. ते निश्‍चित विजयी होतील. माझ्या आमदारकीची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. त्यानंतर मंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाची कोणतीही नाराजी माझ्यावर नव्हती, असेही त्यांनी पुढे नमूद केले. राजीनामा दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांना थांबायला सांगितले. त्यामुळे सावंत आज मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले. मंत्रालयात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दीपक सावंत येणार कि नाही अशी उत्सुकता होती. पण, बैठक सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी सावंत बैठकीच्या सभागृहात पोहचले. एकीकडे सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला असला तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी थांबण्यास सांगितले असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहेत. यावर ते त्यांनी स्पष्ट केले कि, 7 जुलैपर्यंत माझी परिषदेची मुदत आहे. तोपर्यंत मी पदावर राहीन. पण, त्यानंतरची वाटचाल अद्याप स्पष्ट झालेली नाही. विलास पोतनीस यांना तिकीट दिल्याने माझी कोणतीही नाराजी नाही किंवा पक्ष प्रमुखही माझ्यावर नाराज नाही असेही त्यांनी सांगितले.
ढंगारे अद्याप घरीच 
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हरिभाऊ आनंदराव ढंगारे यांची जल व भुमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे महासंचालक पदावर 14 मार्च रोजी बदली झाली परंतू नवीन नियुक्तीच्या जागी अद्यापीही ढंगारे यांना रुजू करून न घेतल्यामुळे जलसंपदा आणि जलसंधारण या दोन विभागातल्या समन्वयाचा अभाव आणि शासनाचं निद्रिस्त धोरण चव्हाट्यावर आले आहे.