Breaking News

मोबाईलचा खिशात स्फोट, घटना सीसीटीव्हीत कैद


मुंबई - आपल्या खिशातील मोबाईल हा प्रसंगी जीवघेणा ठरू शकतो, हा अनुभव भांडुपमध्ये एका नागरिकाने घेतला आहे. भांडुप स्टेशनजवळ असलेल्या हॉटेलमध्ये एका नागरिक ाच्या शर्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुंबईच्या भांडुप स्टेशनजवळ असलेल्या बगीचा हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. यावेळी त्या ग्राहकाने शर्टच्या खिशातील मोबाईल बाहेर फेकून दिला. या घटनेत त्या व्यक्तीला मोठी दुखापत झाली नाही. मात्र हॉटेलमधील अचानक झालेल्या स्फोटाने ग्राहक घाबरून गेले होते.