वाराणसीत फ्लायओव्हर कोसळून 12 जण ठार
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये निर्माणाधीन असलेल्या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत जवळपास 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.कँट स्टेशनजवळ या फ्लायओव्हरचं काम सुरु होतं. मात्र आज मंगळवारी संध्याकाळी अचानक या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या रस्त्यावर वाहतूक सुरु होती. या फ्लायओव्हरच्या कोसळलेल्या ढिगार्याखाली अनेकजण अडकले आहेत. फ्लायओव्हरखालून जाणार्या अनेक कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून त्यात अनेकजण अडकले आहेत. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही दु:खद घटना असल्याचं म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
ढिगार्याखाली अजून लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य गतीने सुरु आहे. आत्तापर्यंत कामगारांसह काही जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, काही लोक अडकले असल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा फ्लायओव्हर कॅन्टॉन्मेंट परिसरात असून याठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे ढिगार्याखाली आणखी काही जण अडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.