Breaking News

पाण्याअभावी शेती पिकांचे नुकसान

उन्हाळा म्हटले की, बहुतांश ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. माताभगिनी तसेच जनावरांना घोटभर पाणी मिळविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. हे विदारक सत्य आपल्याला दरवर्षीच पाहावयास मिळते.

परंतु मेहनत घेऊन अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा, शेरणखेल तसेच दिगंबर येथील काही शेतकर्‍यांनी निळवंडे धरण लाभ क्षेत्रातुन पाईपलाईनद्वारे शेतात पाणी उपलब्ध केले. तरीही मानवी जीवन हे बहुतांश निसर्गावरच अवलंबुन आहे. 1 जून रोजी पावसाला तूरळक सुरूवातही झाली. त्याचबरोबर प्रचंड वादळ-वारे वाहू लागले. त्यातच आता पावसाने दडी मारली, परंतु या वादळ वार्‍याने मात्र विद्युत वितरण कंपनीचे विद्युत वाहक तारा तसेच विद्युत खांबळे पुर्णपणे तुटल्याने गेली 15 ते 20 दिवसांपासून येथील लाईट नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे राजूर येथील उपअभियंते रामनाथ कुटे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेवून परिस्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचंड वादळी परीस्थितीत येथील परिस्थिती सुस्थितीत होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे पावसानेही दडी मारली आहे. अशा दुहेरी परिस्थितीने येथील शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ऊस, झेंडू, भुईमुग, चवळी, फ्लावर, भेंडी, गोराणी तसेच जनावरांचा चारा घास व मका आदी पिके पाण्याअभावी येथील शेती पिकांचे प्रचंड नूकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादकता घटून येथील शेतकर्‍यांना निश्‍चितच आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस पाटील चंद्रकांत लगड, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण आभाळे, नवनाथ लगड, रविंद्र लगड, वाळीबा लगड, संदिप आभाळे, रोहिदास लगड, मारूती आभाळे, आजित आवारी, पंढरीनाथ बगनर, विठ्ठल बगनर, तुळशिराम बगनर, माजी सरपंच भाऊसाहेब कासार, बाळासाहेब कासार, संतोष कासार, म्हतारबा कासार यांसह परिसरातील शेतकर्‍यांच्या उन्हाळी पिकांना पाण्याचा चांगलाच फटका बसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. यात नेमकी चूक कोणाची निसर्गाची की, मानवी यंत्रणेची हाच प्रश्‍न सतत शेतकरी वर्गाला सतावतो आहे.