Breaking News

डॉ. संजय कुलकर्णी यांनी वैद्यकीय शिक्षणाचे नवे दालन खुले केले - डॉ.के.एच.संचेती


पुणे, दि. 02, मे - भारतात 1950 ते 2000 पर्यंत वैद्यकीय शास्त्रातील नवे ज्ञान मिळविण्यासाठी येथील विद्यार्थी विदेशात जात असत. पण, डॉ. कुलकर्णी यांनी युरोसर्जरीत केलेले कौशल्यपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी जगभरातील डॉक्टर भारतात येत आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे वैद्यकीय ज्ञानाचे दालन म्हणून पाहत आहे, असे विचार जागतिक किर्तीचे अस्थिरोग तज्ञ पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती व्यक्त केले.

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ व तळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जागतिक कीर्तीचे मूत्रविकार शल्यचिकि त्सक (युरोसर्जन) डॉ. संजय बी. कुलकर्णी व डॉ. ज्योत्स्ना एस. कुलकर्णी या दाम्पत्याला ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतीचिह्न असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अध्यक्षस्थानी जग प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ आणि नालंदा विश्‍वविद्यालयाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे होते. डॉ. के.एच. संचेती म्हणाले, वैद्यकीय ज्ञान प्राप्तीसाठी भारतात येणाचा जो प्रवाह निर्माण झाला आहे त्यात डॉ. कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आपले कौशल्य आणि ज्ञानाचे दार जगातील वैद्यकीय शिक्षण घेणार्यांसाठी उघडे केले आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात सर्व कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. एकंदरित समाजामध्ये आणि विशेषकरून वैद्यकीय क्षेत्रात एकमेकांला पूरक असे काम क रणारे आणि तेही वर्षानूवर्ष कार्य करीत राहणारे डॉ. संजय व डॉ ज्योत्स्ना कुलकर्णी हे जोडपे जवळ-जवळ दुर्मिळच आहे.
सत्काराल उत्तर देतांना डॉ. संजय व ज्योस्त्ना कुलकर्णी म्हणाले, स्कॉलरशीपच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतांना मला डॉ. संचेती, डॉ. बापट यांच्या सारख्या तज्ज्ञांकडून कौशल्यपूर्ण सर्जरीचे धडे मिळाले. त्याच्याच जोरावर आज जगभरातील डॉक्टरांना यूरोसर्जरीचे प्रशिक्षण देणे व दर वर्षी जवळपास 500 ऑपरेशन्स करुन जगातील क्रमांक एकचा डॉक्टर बनलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. रुग्णांना योग्य सल्ला व योग्य उपचार देणे हेच लक्ष ठेऊन सदैव कार्य करीत राहणार आहे. त्यासाठी 100 बेडचे अत्याधुनिक सुविधांचे कुलकर्णी हॉस्पिटल लवकरच सुरू क रणार आहोत.

डॉ. विजय भटकर म्हणाले, येथे जो सत्कार झाला तो संपूर्ण भारतीय वैद्यकीय क्षेत्राचा सत्कार आहे. विदेशातील लोक येथे ज्ञान प्राप्त करण्यासाठी येतील, असे विद्यापीठ तयार करण्याची आवश्यक ता आहे. अशा विद्यापीठाचे बीजारोपण डॉ. कुलकर्णी दाम्पत्याने केले आहे. सुश्रृत हा जगातील सर्वात पहिला सर्जन होता. या जोडप्याने अशा प्रकारच्या शल्यकर्माची कीर्ती जगभर पसरविली आहे. ज्यांच्या नावने ऑपरेशनची एखादी पद्धत ओळखली जाते असे ते भारतातील अतिशय मोजक्या अशा डॉक्टरांपैकी एक आहेत.