चांदेकसारे अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीची मदत कर्मवीर काळे उद्योग समुहाचा पुढाकार
तालुक्यातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार नागरिकांची वस्ती आहे. जवळपास ८०० नागरिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी नुकतीच भेट घेत त्यांना धीर दिला. कारखाना उद्योग समुहाच्यावतीने सर्वतोपरी तातडीची मदत केली.
गुरुवारी {दि. २१ } सायंकाळी सर्वदूर झालेल्या पावसाने तालुक्यातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात दाणादाण उडविली. या पावसामुळे जवळपास १०० च्यावर घरांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती समजताच युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जाऊन संबंधित यंत्रणेला नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या. या अचानक आलेल्या पावसामुळे लहान मुलांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. काही २० शेळ्यांसह शेकडो कोंबड्या दगावल्या. संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. त्याचबरोबर घरातील अन्नधान्य आणि रेशनकार्ड, आधार कार्ड वाहून गेले. त्यामुळे हे सर्व नागरिक निराधार झाले.
नागरिकांची युवा नेते आशुतोष काळे यांनी भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली. नागरिकांच्या घरांमध्ये जवळपास चार फूट पाणी साचले होते. ज्या घरांचे पत्रे उडाले आहे.
सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे, संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, शंकरराव चव्हाण, राजू होन, संजय होन, चंद्रकांत होन, कर्णा चव्हाण, शरद होन, दादासाहेब होन, मिठू सय्यद, नूर मोहंमद शेख, सय्यद बाबा शेख, किरण माळी, विजय माळी, अमोल माळी, अकील शेख, अशरब सय्यद, मोईन शेख आदी कार्यकर्त्यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला.