Breaking News

पानेगावात ग्रामपंचायतीने केले कृषी कन्यांचे स्वागत


पानेगाव प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील पानेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे नुकतेच स्वागत करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच तथा मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले उपसरपंच रामभाऊ जंगले यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले.

यावेळी बोलताना सरपंच जंगले म्हणाले, फिल्डवर्कचा आनुभव सर्व क्षेत्रात करिअर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. भविष्यात कृषी क्षेत्रात करिअर तसेच नवीन रोजगार निर्मिती मोठी संधी आहे. कृषी क्षेत्राला नक्कीच अच्छे दिन येतील. यावेळी उपसरपंच रामभाऊ जंगले यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी कन्या स्वाती खाटीक म्हणाली, चार महीन्यांच्या फिल्डवर्क कार्यानुभवच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजीपाला, फळ झाड, माती परीक्षण, धान्य वाढीसाठी तसेच त्यावर पडणाऱ्या रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जीवाणूवर्धक बीजप्रक्रिया आदी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी यावेळी करण्यात येणार आहे. कृषी कन्या प्रतिभा फुंदे, भारती आव्हाड, स्वाती खाटीक, भाग्यश्री बनकर, सुरेखा वाळुंज, आशा जोसेफ, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब घोलप, रमेश जंगले, विक्रम जंगले, शकिल जंगले, सुनील जंगले आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.