हे तर हरामांचे राज्य झाले आहे -धनंजय मुंडे
मुंबई : पीक कर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी ऐकुण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतले आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे.