रमजान लेख - अल्लाहच्या नजरेत सर्व समान; तुमचा हेतू त्याला पूर्ण माहीत आहे
रमजान महिन्याच्या शेवटच्या चरणात एक विशेष प्रार्थना (ईबादत) ‘एतेकाफ’ म्हणून ओळखली जाते. 21 व्या रात्रीपासून शेवटी चंद्रदर्शन होईपर्यंत दहा दिवस मशिदीत वास्तव्य करून राहणे (पुरुषाने) याला एतेकाफ म्हणतात. या काळात नियमित नमाज पठणाशिवाय तिलावतेकुरआन व अल्लाहचे नामस्मरण सतत करावयाचे असते. आवश्यक दैनिक विधीसाठी फक्त मशिदीबाहेर पडता येते. याशिवाय इतर कोणाशीही इतर विषयांवर संभाषण करता येत नाही. दहा दिवस वास्तव्य मशिदीत असते. प्रत्येक मशिदीतून किमान एका व्यक्तीने एतेकाफसाठी बसणे आवश्यक आहे. एखाद्या वस्तीत कोणीच बसले नाही तर संपूर्ण वस्ती गुन्हेगार ठरते. या प्रार्थनेत अल्लाहशी जवळीक साधण्याच्या हेतुनेच प्रार्थना केली जाते. महिला घरात एतेकाफ करतात.
जगातील सर्वच धर्मांनी मानवता धर्माचा पुरस्कार केला आहे. कोणताही धर्म, द्वेष, राग, मत्सर या भावना शिकवित नाही. अल्लाहच्या नजरेत सर्व लोक समान आहेत. इस्लामची मूळ शिकवण म्हणजे अल्लाह एक आहे व तोच या जगाचा पालनहार आहे. त्याच्या समान दुसरा कोणी नाही व मोहम्मद पैगंबर (स.) हे त्याचे प्रेषित व रसूल आहेत. ते समस्त मानव जातीसाठी पैगंबर म्हणून पाठविले गेले आहेत. अल्लाहने आपल्या भक्तांनाही खूप अधिकार देऊन ठेवले आहेत. मात्र, अंतिम अधिकार हा त्यांच्याकडेच आहे, त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही.
पूर्वीच्या काळात शहाद नावाचा बादशाह होऊन गेला. तो स्वतःला परमेश्वर म्हणून संबोधित असे मीच तुमचा परमेश्वर असून, माझी प्रार्थना करा, असे तो लोकांना सांगे. त्याने पृथ्वीवर स्वर्गाची (जन्नत) निर्मिती केली. स्वर्ग तयार केला व त्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्या मिरवणुकीने तो निघाला. त्याने तयार केलेल्या स्वर्गाच्या दारात पोहोचल्यावर त्याचा एक पाय आत व एक बाहेर असतानाच अल्लाहने त्याचा आत्मा (रुह) काढून घेतला. यातून सर्व जगाला शिकवण मिळाली की, सर्व शक्तीमान अल्लाह आहे. अल्लाहच्या मोठेपणाची साक्ष देणारी अशी शेकडो उदाहरणे आपल्यासमोर आहे. त्यातून माणसाने योग्य तो बोध घेऊन परमेश्वर अर्थात अल्लाहचीच भक्ती करण्याचा निश्चय केला पाहिजे. प्रत्येक धर्माच्या परंपरा वेगळ्या असल्या तरी शेवटी सार एकच आहे. त्यामुळे आपापल्या धार्मिक, रिती-रिवाजानुसार अनुपालन करताना त्यातील नेमका अर्थ समजून घेऊन आपल्यापुढे इतरांना त्रास वा दुःख होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने बाळगल्यास हा देश व हे विश्व निश्चितच सुजलाम् सुफलाम् होईल. रमजान महिन्यात शेवटच्या काही दिवसात इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या जातात. जगभरही प्रथा रूढ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून गावातील सरपंचापर्यंत या पार्ट्या दिल्या जातात. या आयोजनामागचा हेतू परस्पर स्नेहभाव वृद्धींगत व्हावा. मनातील असलेली कटुता दूर व्हावी व शक्य तेवढे एकमेकांच्या जवळ जाऊन बंधूभाव वाढीस लागावा. काही वेळा शिष्टाचार म्हणूनही अशा प्रकारचे आयोजन केले जाते.
इफ्तार (सूर्यास्ताच्यावेळी उपवास सोडण्याची प्रक्रिया म्हणजे इफ्तार) बाबत अल्लाहने काही स्पष्ट संकेत दिले आहेत. इफ्तारची वेळही दुआ मागण्याची व आपल्या मनातील भेद अल्लाहकडे सादर करण्याची वेळ आहे. ती वेळ भाषणबाजी करण्याची नाही. इफ्तारच्या वेळी भक्त व अल्लाहचे निकटचे संबंध प्रस्थापित होतात. आपल्या भक्ताने इफ्तारप्रसंगी मागितलेली दुआ (प्रार्थना) अल्लाह कधीही रद्द करीत नाही. तसेच रोजेदारांचा इफ्तार करविणार्यांनाही रोजेदाराएवढेच पुण्य प्राप्त होते. तेव्हा इफ्तारचे आयोजन करण्यामागचा उद्देश व हेतू शुद्ध असला पाहिजे. जे लोक दरवर्षी निःस्वार्थी भावनेने इफ्तार देतात, ती खरी प्रेमभावना म्हणावी. कधी तरी काही तरी उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दिल्या जाणार्या इफ्तार पार्ट्यापासून मुस्लीम बांधवांनी दूर राहणेच चांगले. आपण कोणत्या तरी हेतूने प्रेरित होऊन एखादे कार्य हाती घेत असतो. त्याच्या समर्थनाची किंवा विरोधाची तयारी केलेली असते. मात्र, आपण काही तरी सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी अल्लाहला आपल्या सर्व हेतूंची कल्पना आहे. परमेश्वर हा अंत:र्यामी असल्यामुळे आपल्या सर्व कामांची त्यांच्या उद्देशांची त्याला पूर्ण कल्पना आहे.