Breaking News

पनामा पेपर्स लीकमध्ये भारतीय उद्योजकांची नावे

नवी दिल्ली : जगभर खळबळ उडवून देणार्‍या पनामा पेपर्स लिक प्रकरणात आता पुन्हा भारतीय उद्योजकांची नावं समोर आलीये. यामध्ये पीव्हीआर सिनेमाचे मालक अजय बिजली, सुनिल मित्तल यांचा मुलगा आणि हाईक मेसेंजरचे सीईओ कवीन भारती मित्तल, एशियन पेन्टसचे प्रवर्तक अश्‍विन धनी यांचा मुलगा जलज अश्‍विन धनी याच्या नावाचा समावेश आहे. यात केबीएम ग्लोबल लिमिटेटचे प्रवर्तक कवीन भारती मित्तल यांचाही समावेश आहे. केबीएम ग्लोबल लिमिटेड ब्रिटिश वर्जन आइलंड (इतख) मध्ये डिसेंबर 2008 में रजिस्टर केली होती. 2016 मध्ये पनामा पेपर्स छापण्यापूर्वी 3 आठवडे आगोदर पनामाची लॉफर्म मोसैक फोनसेकाला पाठवलेल्या मेलमध्ये काही भारतीयांची नावे समोर आली आहेत.