13 ठिकाणी अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट सुविधा
पुणे, दि. 21, जून - शहरात अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट बसची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएल करिता देण्यात आलेल्या 13 बसेस सुरु करण्यात येणार आहेत. त्याकरिता 25 लाख 33 हजारांची तरतूद करण्यात आली असून स्थायी समितीने त्याला मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिका परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून कमी क रण्यात येणार्या शंभर बस मोबाईल टॉयलेटकरिता देण्याबाबतचा ठराव आहे. त्यातील पीएमपीएमएलच्या ताफ्यातून 13 बस महापालिकेला देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 12 बसमध्ये सीएसआर निधीतून शौचालय तयार करण्यात आले आहे. तर सदर 13 बसची अपसेट प्राईज महामंडळाच्या गठीत समितीने निश्चित केलेली आहे. त्याप्रमाणे ठरविलेली रक्कम महामंडळाकडे जमा करणे आवश्यक असून त्याला स्थायीने मान्यता दिली आहे.
शहरात 10 ठिकाणी सेवा सुरू
सध्या मनपा हद्दीत 10 बसची सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहाची समस्या दूर करण्यात मदत झाली आहे. शहरात सध्या सिंध सोसायटी, आयटीआय रोड, संभाजी पार्क, सिमला ऑफिस, शनिवारवाडा, राजारामपूल, सनसिटी, बाणेर, गोखलेनगर, चव्हाण शाळा, बिबवेवाडी , विश्रांतवाडी या ठिकाणी या बसच्या माध्यमातून स्वच्छतागृहाची सेवा दिली जात आहे.