Breaking News

भारताविरुद्ध टी-२० सामन्यांसाठी आयर्लंडचा संघ जाहीर


नवी दिल्ली

भारताचा इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी २७ व २९ जून रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात २ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या २ टी-२० सामन्यांसाठी आज आयर्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. गॅरी विल्सनकडे १४ सदस्यीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

भारताविरुद्ध आयर्लंडचा संघ –

गॅरी विल्सन (कर्णधार), अँड्रू बालब्रिनी, पिटर चेस, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटील, अँड्रू मॅकब्रेन, केविन ओब्रायन, विल्यम पोर्टरफिल्ड, स्टुअर्ट पॉयंटर, बॉईड रँकीन, जेम्स शानॉन, सिमी सिंह, पॉल स्टिर्लींग, स्टुअर्ट थॉम्पसन