Breaking News

पाथर्डीत संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा


पाथर्डी/श.प्रतिनिधी/- श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त शहरातून महाराजांच्या पादुका व पालखीचीे वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आळंदी येथील वारकरी मुले होते. रविवार ,४ फेब्रुवारीच्या सकाळी साईनाथ नगर येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रसाद आव्हाड, चाँद मणियार, बंडू बोरुडे, विष्णुपंत चिंतामणी, नंदकुमार डाळिंबकर, यांच्यासह आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीत महाराजांच्या जीवांचारित्रावर पथनाट्य सादर केले गेले. मिरावणुकीची सांगता नवी पेठेतील नरहरी महाराज मंदिरात करण्यात आली. ह.भ.प. प्रवीण महाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक कार्यक्रम पार पडला तसेच हभप शिवाजी महाराज फुंदे यांचे प्रवचन झाले. यावेळी तांदळे महाराज, उबाळे महाराज, मधवबाबा उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार योगेश घोडके व विद्या घोडके यांनी केला तसेच महाप्रसादाचे वाटपही केले.